स्मशानातील सोनं… -आण्णा भाऊ साठे

Atul Wankhade
7 min readApr 24, 2021

शेजारच्या गावात एकबलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकूनभीमान ताडकन मारली..त्याला समाधानाचं भरतआलं.आनंद त्याच्या हृदयातमावेनासा झाला..त्यानं त्या गावाकडे पाहून भरकनआपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली..सूर्यतेव्हा मावळत होता..आकाशातपावसाळी ढगांनी गर्दी केली होती..ते नांगरूनपडलेल्या जमिनीप्रमाणे ओबड धोबड दिसत होते..त्या आक्राळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाशमुंबईवर वर्षात होता..वारा मंद वाहतहोता..त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतंआणि त्या जंगलात बसलेली ती पन्नासझोपडी भेदरलेली होती..जुने पत्रे, चटया, फळ्या,पोती यांनी तिथं घरांचा आकारघेतला नि त्या घरातमानसं राहात होती..बेकारवस्तूंनी तिथं बेकारांवर च्या धरली होती..दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली मानसंआता तिथं स्थिरावली होती..सर्वत्रचुली पेटल्या होत्या..हिरव्या झाडीतून शुभ्र धूररेंगाळत होता पोर खेळत होती. एका प्रचंडचिंचेखाली भीमा विचारमग्नबसला होता.त्याच्या हृदयात बायंकर हुरहूरउठली होती..त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओलागली होती..त्याचा आत्मा कित्येकवेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परतत्या चिंचेखाली येत होता..भीमा पुनः पुनः सूर्याकडे पाहून त्या गावाकडेपाहत होता..त्याला आता अंधाराची गरजहोती..म्हणून तो चुळबुळतहोता..त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळतहोती आणि बायको घरात भाकरी थापीत होती..

हा भीमा अंगापिंडान जबरा होता..तो भरपहिलवाना सारखा दिसे..त्याचं प्रचंड मस्तक,रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पणतापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हूडहुडीचभरत असे..भीमाच गाव दूर वारणेच्या काठी होत..पणरेड्याच बळ असूनही पोट भरत नाही..म्हणूनतो मुंबईला आला होता..मुंबईत येऊन त्यानं काममिळावं म्हणून सगळी मुंबईपालथी घातली होती..पण त्याला काम मिळालंनव्हतं..आपणाला काम मिळावं, आपण कामगारव्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळकरावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराशहोऊन त्या उपनगरात, जंगलात आला होता..

मुंबईतसर्व आहे पण काम आणि निवारा या दोनगोष्टी नाहीत..यामुळे त्याला मुंबईचा रागआला होता आणि त्या उपनगरा जवळ येताचशेजारच्या डोंगरात एका खाणीतत्याला कामही मिळालं होत..त्या जंगलात कामआणि निवारा मिळताच भीमाला आनंदझाला होता..

तो आपलं रेड्याच बाल घेऊनत्या डोंगराला जणू टक्करच देत होता..त्यानंटिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता..त्यानंसुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरतहोते..त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुशहोता आणि भीमाही संतुष्ट होता; कारणत्याला पगार मिळत होता..परंतु सहाच महिन्यातती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कु-हाड कोसळली..

तो एका सकाळीच कामावर रुजूझाला आणि लगेच त्याला समजले कि आजपासूनहि खाण बंद झाली,आपलं काम सुटलंहि वार्ता ऐकून भीमा भांबावला.. उपासमारत्याच्यापुढे नाचू लागली..क्षणाततो विवंचनेच्या डोहात बुडाला..उद्या कायहा एकाच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला..अंगातील कापडं काखेत दाबूनभीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावरथांबला..त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्नमनःस्थितीत तो घराकडे फिरला..तो त्याची नजरएका राखेच्या ढिगा-यावर स्थिरावली. ती राखमढ्याची होती..जळकी हाडं सर्वत्रपसरली होती..त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळभीमा अधिकच गंभीर झाला..एखादं बेकार असेलबिचारे, कंटाळूनच मेलं असेल.सुटलं असेल एकदाचअसं मनाला सांगू लागला..आपणही असेचमरणार..!

दोनच दिवसात उपासमार सुरु; मगनाबदा रडत बसेल..बायको मलूल होईलआणि आपण काहीच करू शकणार नाही..इतक्यात त्या राखेच्या ढिगावरकाहीतरी चमकलं..तसा भीमा पुढे आला..त्यानेवाकून, निरखून पाहिलं..तिथं एकतोळ्याची सोन्याची अंगठी होती..ती चटकनउचलून भीमान करकरून मुठ दाबली..त्याला आनंदझाला..एक तोळा सोनंआणि तेही मढ्याच्या राखेत, याचा त्याला हर्षझाला..मढ्याच्या राखेत सोनं असतंयाचा त्याला नवा शोधलागला..

जगण्याचा नवा मार्ग सापडला..आणि दुस-याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशातसर्वत्र हिंदू लागला..नदी नाल्यातील मसनवटेतुडवू लागला..प्रेताची राख जमवून तो चाळणीनचाळू लागला..आणि रोज त्या राखेतून सोन्याचेकण काढू लागला.. बाळी, मुदी,नथ,पुतळी,वाळा,असे काही न काही घेऊन रोजयेऊ लागला..भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरुहोता..तो निर्भय होऊन राख चाळीतहोता..अग्नीच्या दाबान प्रेताच्या अंगावरच सोनंवितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठावघेतला..जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कणकाढी..कवट्या फोडी मनगट कुटी पण सोनं मिळवी..संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकूनरोख रक्कम मोजून घेई आणि घरी येतेवेळी नाबदा साठी खजूरघेई.त्याचा तो धंदा अखंड चालला होता…

भीमा प्रेताची राख चाळून जगत होता..त्यामुळेजगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासेझाले होते..ज्याच्या राखेत सोनं असेल ती राखश्रीमंताची आणि सोनं नसेल ती राखगरीबाची अशी त्याची ठाम समजूतझाली होती मरावं तर श्रीमंताने आणि जगावं तरश्रीमंतान गरिबांन मारू नयेअसा त्याचा दावा होता..अवमानितपामराला जगण्याचा नि मरण्याचा मुळीचअधिकार नाही असं तो शेजा-यांना दरडावूनसांगत होता..जो मरतेसमयी तोळाभर सोनं दाढेतघेऊन मरतो तो भाग्यवान असतो..असं त्याच मतहोत..बेकारीच्या उग्रतेन त्याला उग्र केलंहोत..तो रात्रंदिवस मसणवटी धुंडाळीत होता..मढहे त्याच्या जीवनच साधनं झालं होत..त्याचंजीवन मढ्याशी एकरूप झालं होत..

त्याचं दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडतहोते..पुरलेली मढी बाहेर पडत होती..एका सावकाराच्या तरुण सुनेचे प्रेत स्मशानातूननदीवर येऊन पडले होते..आणि त्या प्रकारामुळेकित्येक लोक भयभीत झाले होते..अलीकडेमढी नदीपर्यंत कशी जातात त्याचं यांना नवलवाटत होत..कुणीतरी प्रेत उकरून काढीतअसावा असा संशय येऊन पोलीस खात पाळतीवरहोत..पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपंनसतं..

सूर्य मावळला..सर्वत्र अंधारपसरला…भीमाच्या बायकोनं भीमाला जेवणवाढलं..तेव्हा तो गंभीर होऊन जेऊ लागला..आजहा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूचम्हणाली,”आज कुठं जाणार वाटतं..?मला वाटतं हेकाम नको आम्हाला..कुठंतरी दुसरं काम करा..मढ,मढ्याची राख,सोनं,संसार हे सारंच विपरीतआहे लोक नावं ठेवतात..”

“तू बोलू नको..”तिचंबोलणं एकूण भिमाचं मनदुखावलं..तो चिडक्या स्वरातम्हणाला..”मी काहीही करीन..त्याचं काय जातं..?माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहेका..?”

“तसं नव्हे “नव-याचा तो उग्र चेहरा पाहूनती हळूच म्हणाली,”भुतासारखं हे हिंडणं चांगलंनाही..मला भीती वाटते म्हणून म्हणते..”

“मसणवट्यात भुतं असतात असंतुला कोणी सांगितलं..?अग,हि मुंबई एकभूतांचा बाजार आहे..खरी भुतं घरात राहतातआणि मेलेली त्या मसणवट्यात कुजतातभूतांची पैदास गावात होते रानात नाही..”भीमा म्हणाला..

त्याचं हे बोलणं ऐकूण ती गप्पझाली आणि भीमान निघण्याची तयारी केली तूगुरकून म्हणाला,”मुंबई चाळून मला काम मिळालंनाही..पण मढ्याची राख चाळून सोनं मिळालं..डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला..पणआता सहज ती राखमला दहा रुपयेही देते..”असं म्हणून तो घराबाहेरपडला..तेव्हा बरीच रात्र झाली होती..सर्वत्रनिःशब्द शांतता नांदतहोती नि भीमा निघाला होता…

भीमा अंधारातूननिघाला होता त्यानं डोकीला टापरबांधली होती..वर पोत्याची खोळघेतली होती..आणि कंबर बांधलेली होती..काखेतएक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीतहोता.त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीतहोता..त्याला कसलीही भीती वाटतनव्हती..सकाळी लुगडं, एक परकर पोलका,खजूरएवढाच विचार करीत होता..आजतो बिथरला होता..वातावरण घुमत होतं..क्षणोक्षणी गंभीर होतहोतं,मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुकी देऊनपळत होतं..एखादा साप सळसळत वाट सोडूनजात होता..दूर कुठंतरी घुबड घुत्कार करूनभेसूरतेत भर घालीत होतं. त्या निर्जन जंगलातसर्वत्र ओसाड दिसत होतं कानोसा घेतभीमा गावाच्या जवळ आला..त्यानं खाली बसूनदूर पाहिलं..गावात सामसूम झाली होती अधून मधूनकोणीतरी खाकरत होतं,एखादा दिवा डोळेमिचकावीत होता..परिस्थिती अनुकूल आहे असंपाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकनस्मशानात शिरूनत्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधूलागला फुटकी गाडगी,मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरूनत्या गोरीवर उड्या मारीत निघाला..प्रत्येकढेपनिपाशी जाऊन कडी ओढून पाहूलागला.एका रांगेने तो नीर काढीत निघाला होता..आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधारअधिकच कला झाला होता;पण एकाएकी वीजउठली होती..ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती..पाऊस पडण्याचा संभव वाढला होता..त्यामुळेभीमा घाबरला होता..पाऊस पडला कि, नवी गोरसापडणारनाही,याची त्याला चिंता पडली होती, म्हणूनतो चपळाई करीत होता..त्याला घामफुटला होता नि तो भान हरपला होता..मध्यानरात्री पर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं..या टोकापासून त्या टोकाला तो जाऊनपोहचला आणि भयचकित होऊन मटकन बसला..वर भरभरत होता..मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडतहोत्या.जणू कोणीतरी दातचं खात असावं, तसंऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गरगुर उठतहोती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतंआणि माती उकरीत होतं..त्याला नवल वाटलं..तो पुढे सरकला तोच सर्व काही शांत झालं..आवाज येईनासा झाला;परंतु तोच कुणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला..खटकन जागीच थांबला..विद्युतगतीनंभीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडेधावली..आयुष्यात आजच तो प्रथम भयभीतझाला..परंतु दुस-याच क्षणी त्यानंस्वतः ला सावरलं..खरा प्रकार त्याच्या लक्षातआला आणि तो स्वतःचं खजील झाला..कारणजवळचं ती नवी गोरहोती..आणि दहा पंधरा कोळी जमून तिला चौफेरउकरीत होती.त्यांना मेलेल्या माणसाचा वासलागला होता..गोरीवरचे दगड तसेच ठेऊन दुरूनचत्यांनी घळी पडायला आरंभ केला होता..आजुबाजूनं गोर उध्वस्त करण्याचं काम ती करीतहोती; परंतु पुनः त्यांच्यातही भयंकरस्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मढ्या जवळकोण जाणार या इर्षेनं ती एकमेकांवर गुरगुरतहोती..पुनः नाकानं वास घेतहोती आणि प्रेताचा वास येताचती सर्वशक्ती एकवटून माती ओढीत होती…हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला..त्यानंप्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरचजाऊन बसला..लगेच गोरीवरचे दगड उचलून त्यानेत्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला..अचानक झालेल्या त्या भडीमारानंकोल्ही चमकली..चमकली नि मुरून बसली..तसा भीमाला चेव आला..कोल्ह्याआधी आपणचगोर उकरायची असं ठरवूनतो गोरीवाराची माती काढू लागला..आणि त्याचवेळी कोल्ह्यांनी भीमाला पहिला..एककोल्हा पिसाट होऊन भिमावर धावला..क्षणातभीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला..अंगावरचपोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ सरळधरली तो कोल्हा पुनः भीमावरधावला नि त्याच्याशी झुंज घ्यायला तयारझाला..कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला..झपाट्यानं कोल्हा गारद झाला..बाजूला पडूनत्यानं पाय खोडून प्राणसोडला नि रणधुमाळी सुरु झाली..पुनः भीमा गोरउकरू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावरतुटून पडली..भयंकर युद्धाला आरंभ झाला..भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केलेहोते; पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावूनगेला आणि हातात पहार घेऊनत्यानेही प्रतिकाराला सुरवात केली होती..चारी बाजूने कोल्ही त्याच्यावर धावतहोती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडेतो दणका मारीत होता..कोल्हे तीरपडून पडत होतेआणि अचानक लचका तोडून पळत होते…गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलंहोतं..कुंतीपुत्र भीमाच नाव धारणकरणारा तो आधुनिक भीम कोल्हयांशी लढतहोता..उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी,आपली सर्वशक्ती पणाला लावून लढत होता..

पशुआणि मानव यांचे मृतदेहासाठी दारूण रण पेटलंहोतं..सुर्ष्टी निद्रा घेत होती..मुंबई विश्रांती घेतहोती..तो गाव निपचित पडला होता..आणि त्या स्मशानातसोन्यासाठी नि मढ्यासाठी झटापटिला जोरचढला होता..भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीतहोता..कोळी त्याचा मार चुकवूनत्याचा लचका तोडीत होती,किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळतहोती..भीमा लचका तुटताच विवळतहोता..शिव्या देत होता..शिव्या, मार, गुरगुरणे,किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते..कितीतरी उशीरानेकोल्ह्यांचा हल्ला थांबला..अंधारात दबा धरूनती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली..आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतीलते प्रेत काढून मोकळं केलं..तोंडावरचा घाम पुसूनटाकला..आणि तो त्या गोरीत उतरला..तोचपुनः कोळी तुटूनपडली नि पुनः हाणामारीला सुरवात झाली; परंतुभीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूतझाली त्यांनी आपला पराजय काबुल केला…आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हातघालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं..मगकाडी ओढून प्रेताची पाहणी केली..दडदडीतताठलेलं मढ त्याच्या पुढं त्या गोरीत उभंहोतं..त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हातचाचपून पहिला.एक अंगठी सापडली..कानातमुदी होती..ती भीमानं ओरबाडून काढली..नंतरत्याला आठवण झाली कि प्रेताच्या तोंडातनक्की सोनं असणार..त्यानं त्याच्या तोंडात बोटंघातली;पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती..क्षणात त्याने आपली प्रहार प्रेताच्या जबड्यातघालून त्याची बचाळी उचकटली..एका बाजूनती पहार जबड्यात घालून दुसर्या बाजून त्यानंआपली बोटं त्या प्रेताच्या तोंडातघातली आणि त्याचवेळी दबा धरूनबसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुईकेली..सर्वांनी हुकी देऊन पळ काढला..पणत्यांच्या ओरडीनंगावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गावजागा केला..”आरं कोळ्यांनी प्रेत खाल्लं,चला”असं कुणीतरी ओरडलं नि ते ऐकूनभीमा घाबरला..

त्यानं प्रेताच्या तोंडातून एकअंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनंपुनः डाव्याहाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालूनसर्व कोपरे चाचपून पहिले आणि बोटं काढूननंतर पहार काढण्या ऐवजी प्रथम त्यानं पहारचकाढली घटकन त्याची दोन बोटं प्रेताच्या दातातअडकली.. आडकित्यातसुपारी सापडावी तशी सापडली..भयंकर कळत्याच्या अंगात वळवळली..आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन मानसंयेत असलेली दिसली..तसा भीमा भयभीत झाला..त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली..त्याला प्रेताच राग आला..त्याच्याकडेयेणारी मानसं पाहून तो अधिकच चिडला. त्यानेहातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले.आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकचअडकली प्रेताचे दात बोटात रुतले..त्याच्या अंगातमुंग्या उठल्या..हेच खरं भुत हे आपणाला पकडूनदेणार, लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील..नाही तर मारमारून पोलिसांच्या हवाली करतील..असं वाटून भीमा आगतिक झाला..वैतागला,निर्भान झाला..सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावरप्रहार करू लागला..’भडव्या, सोड मला…’ तो जोरानं ओरडला..

गावकरी जवळ होते भीमा अडकला होता..मग त्यानंविचार केला आणि नंतर पहारत्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूचबोटं ओढूनकाढली तेव्हा ती कातरली गेली होती,फक्तचामाडीला चिकटून लोंबत होती..ती तशीच मुठीतघेऊन त्यानं पळ काढला..भयंकर कळ अंगातघेऊन तो पळत होता..तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर तापभरला होता.. त्याची ती स्थिती पाहून घरातरडारड सुरु झाली..त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची दोन बोटं कापूनकाढली…आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुनः सुरुझाल्याची बातमी आली..ती ऐकूनहत्तीसारखा भीमा लहान मुला प्रमाणे रडूलागला..कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटंतो स्मशानातील सोन्यासाठी गमावूनबसला होता…

--

--